Posts

Showing posts from September, 2021

काव्य पुष्प-२४९ ना.धो.महानोर

Image
वाचन साखळी स्पर्धा वाचन समृद्धी कविता लेखन स्पर्धा   विख्यात निसर्ग कवी व गीतकार ना.धों.महानोर जन्मदिन १६ सप्टेंबर  मातीच्या चैतन्याचे गाणे गाऊन  शब्दांचे फुले- मळे फुलवले शेतीत काबाडकष्ट करून  शब्दफळांचे सुगंध दरवळले|| निथळ घामाची शाई करुन  शेतीमातीची ओवी बहरली खुरप्याची लेखणी करुन  रानातली कविता फुलविली || रानशिवारातल्या कवितांचं चित्रपटात झालं गाणं रसिकांच्या मनावर कोरलं ताल बोल अन् ठेक्यानं || काव्यविश्वातले निसर्ग कवी साहित्य पंढरीचे वारकरी  शेतीचा महिमा गाणारे  जगाचे पोशिंदे शेतकरी|| माती अन् बोली भाषेचे  नाते सांगणारी शब्दकळा गाणं मातीच्या चैतन्याचे गाऊन फुलतो फुलमळा|| स्पर्श गंध ध्वनींचा मिलाफ निसर्ग काव्याच्या मैफिलीत लोककथांचे व्यक्तीचित्रण  शब्दझुल्यांच्या अंगणात|| रानातल्या कवितांचं झालं काव्य   निसर्गाच्या सौंदर्याचं गाणं झालं   सूरताल लय बोल अन् ठेक्यानं  रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजलं|| श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे  २९० अ सावित्री सहनिवास गंगापुरी वाई  ता.वाई जि.सातारा पिन-४१२८०३ म...

काव्य पुष्प-२४८ कविता

Image
           कविता  मूक भावभावनांना मिळाली  सजग चेतवत्या शब्दांची साथ  कागदावर नक्षीदार उमटली  अक्षरांची वाजत-गाजत वरात .... उमंग विचार वलये तरंगली हृदय गाभाऱ्याच्या अंतरंगात लेखणीने शब्दमाला गुंफली नवतीच्या इंद्रगोफाच्या रंगात..... नजरेने तिची रुपं न्याहाळली पाहुनी आशयघन गर्भाची खोली वाणीतून प्रकटली लयबध्द बोली बहरली मग शब्दफुलांची झोळी.... भावभावनांनी शृंखला उभारली  हृदयाच्या स्पंदनाची शब्दावली भारावलेल्या सुगंधानी दरवळली ती काव्यरचना अलंकारांनी नटली....

हिरवी पाती काव्यसंग्रह पुस्तक परिचय श्री गणेश तांबे

Image
श्री गणेश तांबे सर फलटण यांनी केलेला पुस्तक परिच य पुस्तक क्रमांक -📗101..🖋️ पुस्तकाचे नाव-हिरवी पाती (कविता संग्रह) लेखक- रवींद्रकुमार लटींगे एक असामान्य व्यक्तिमत्व म्हणजेच आमचे परममित्र रवींद्रकुमार लटिंगे सर यांनी लिहिलेली दोन पुस्तके नुकतीच 13 ऑगस्ट 2021 रोजी प्रकाशित झाली. त्यामध्ये "पाऊले चालती" हे प्रवास वर्णन हे एक पुस्तक व दुसरे म्हणजे, "हिरवी पाती" हा कवितासंग्रह निसर्गरम्य अशा वाई येथील "मधुरा गार्डन" मध्ये हा पुस्तक प्रकाशन सोहळा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने संपन्न झाला. मधुरा गार्डन म्हणजे अनेक हिरव्यागार वृक्षवेलींनी नटलेलली गर्द वनराईच... रवींद्रकुमार सरांनी स्वतःच्या आई वडिलांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करणे हे खरोखरच अविस्मरणीय ,प्रेरणादायी कौतुकास्पद उदाहरण तर आहेच आणि असा खूप दुर्मिळ योग आहे,आणि या सुंदर आणि देखण्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले,ही माझ्यासाठी एक वेगळी पर्वणीच होती. तसेच या काव्यसंग्रहाला माझा शुभ संदेशही आहे. त्यामुळे हा काव्यसंग्रह म्हणजे माझ्या हृदयातील एक कप्पाच असल्याचे मल...

काव्य पुष्प-२४७ शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Image
मला घडविणाऱ्या समस्त गुरुजी आणि  बाईंना  शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! पाटीवर धुळाक्षरे गिरवत   बोटांवर अंक मोजत  शाळेची पुस्तके वाचत  वहीवर अक्षरं उमटवत दंगा मस्ती खेळ खेळत सहलीचा आनंद लुटत  बालसभेत भाषण करत  परीक्षेचे पेपर सोडवत  एकेक इयत्तेची शिडी चढत ज्ञानाचे भांडार उलगडत गाणी गोष्टींची पुस्तके वाचत प्रयोगशाळेत प्रयोग करत  अभिव्यक्तीची संधी मिळवित  स्नेहसंमेलनात अभिनय करत  निबंध भाषण स्पर्धेत व्यक्त होत अमृतरुपी ज्ञानाचे कण वेचत मग शालेय परीक्षा पूर्ण करत  अध्यापक विद्यालयात प्रवेशलो मिळाली संधी अभिव्यक्तीला विचारांची कक्षा रुंदावत गेलो अन् मीही प्राथमिक शिक्षक गुरुजी झालो अभिमानाने मनपुर्वक सलाम , वंदन करतो तयाला ज्या गुरुजीं अन् बाईंनी मला घडविले तयाप्रति नतमस्तक होऊन प्रणाम करतो श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई

पाऊले चालती प्रवासवर्णन परिचय श्री रमेश जावीर सर

Image
......."पाऊले चालती" .... रवींद्रकुमार लटिंगे यांचे भटकंतीचा ध्यास  पूर्ण करणारे  प्रवास वर्णन...... समीक्षक--रमेश जावीर सर खरसुंडी सांगली         सातारा जिल्ह्यातील वाई गणपती मंदिरामुळे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.वाईच्या गणपतीची मूर्ती भव्य असून आजूबाजूला हेमाडपंती पाषाण मध्ये नक्षीकाम केलेली बरीच मंदिरे आजूबाजूला आहेत. कृष्णा नदी चा परिसर विलोभनीय आहे.या ठिकाणी खूप सिनेमांची शूटिंग झालेली आहेत. शिवाय जवळच महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे .सातारा जिल्ह्यामध्ये अनेक गड किल्ले सह्याद्री पर्वत रांगा असल्याने निसर्ग सानिध्यात ची रेलचेल झालेली आहे .अशा या वाईमध्ये रवींद्रकुमार लटिंगे यांचा जन्म झाला ही भाग्याची गोष्ट आहे. श्रीयुत रवींद्रकुमार लटिंगे  हे  पेशाने शिक्षक आहेत. त्यांनी नुकतीच   'हिरवी पाती'   कविता संग्रह व 'पाऊले चालती 'प्रवास वर्णन  ही दोन पुस्तके प्रकाशित केली आहेत. पाऊले चालती हे ग्राममित्र पब्लिकेशन नांदलापूर तालुका कराड जिल्हा सातारा तर्फे जुलै  २०२१मध्ये प्रकाशित झाले. या प्रवास वर्ण...