पुस्तक परिचय क्रमांक:२५९गोष्टींचं एटीएम
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२४९ पुस्तकाचे नांव-गोष्टींचं एटीएम लेखक :प्रा.श्याम भुरके प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-द्वितीयावृत्ती, ऑगस्ट,२०१७ पृष्ठे संख्या–१३० वाड़्मय प्रकार-कथासंग्रह किंमत /स्वागत मूल्य-१५०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २४९||पुस्तक परिचय पुस्तकाचे नांव-गोष्टींचं एटीएम लेखक:प्रा.श्याम भुरके 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 ‘विनोद’ हा जीवनाचा नैसर्गिक आरोग्यवर्धक शब्दवेलींचा अर्क आहे. विनोद ऐकल्याने आपण मनसोक्त हसतो. दिलखुलासपणे दाद देतो.अगदी लोटपोट होतो.इतकी ताकद विनोदात असते. तमाश्यातला सोंगाड्या फार्सिकल बोलून आपल्याला हसायला लावतो.तसेच विनोदी चित्रपट आणि दूरदर्शन मालिका पाहताना आपण ताजेतवाने होतो. अनेक विनोदी साहित्यिकांनी अवतीभोवतीच्या परिसराचे निरीक्षण करून आणि माणसांच्या दैनंदिन घटनांचे नकळतपणे घडलेले किस्से, समर्पक शब्दात टिपून एकमेकांशी शेअर केलेले आहेत.एखाद्या गोष्टीवर भाष्य चपखलपणे , समर्पक शब्दात आणि समयसू...