Posts

Showing posts from February, 2026

पुस्तक परिचय क्रमांक:२६३ थैलीभर गोष्टी

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२६३ पुस्तकाचे नांव-थैलीभर गोष्टी  लेखक: सुधा मूर्ती  अनुवाद: लीना सोहोनी  प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती- पुनर्मुद्रण जून,२०१७ पृष्ठे संख्या–१८२ वाड़्मय प्रकार-कथासंग्रह किंमत /स्वागत मूल्य-१७०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २६३||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव-थैलीभर गोष्टी  लेखक: सुधा मूर्ती  अनुवाद: लीना सोहोनी  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚   “लहान मुलांचं मन हे ओल्या मातीच्या भिंतीसारखं असतं.या लहान वयात त्यांना काहीही शिकवणं म्हणजे धारदार काचेच्या तुकड्याने त्या भिंतीवर नक्षीकाम करण्यासारखं असतं.मुलं मोठी झाली तरी,या वयात त्यांच्या मनावर जे काही बिंबवण्यात आलेलं असतं.ते तसंच कायम राहतं.त्यामुळे मुलांवर योग्य वयात योग्य त्या नितीमूल्यांचे संस्कार करणं फार महत्त्वाचं असतं.ह्या संस्काराची शिदोरी त्यांना आयुष्यभर उपयोगी पडते.”        —सुधा मूर्ती   बाळगोपाळांचे विश्व समृद्ध करणारे ‘थैलीभर गोष्टी’...

पुस्तक परिचय क्रमांक:२६२ पाणपोई

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२६२ पुस्तकाचे नांव-पाणपोई लेखक: व. पु. काळे प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती- सुधारित आवृत्ती ऑक्टोबर,२०१७ पृष्ठे संख्या–१२४ वाड़्मय प्रकार-कथासंग्रह किंमत /स्वागत मूल्य-१३०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २६२||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव-पाणपोई लेखक: व.पु. काळे 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚  वैयक्तिक अनुभवांना सामाजिक आशयाचे कोंदण निर्माण करुन साठवून ठेवलेलं अक्षरधन ‘पाणपोई’तून मुक्तहस्ते अनेक कथासंग्रहातून वाचक रसिकांना बहाल करणारे, वाटणारे लोकप्रिय लेखक तथा कथाकथनकार व.पु.काळे यांची संचित शब्दांची ‘पाणपोई’.वाचनातून इतरांना आनंद वाटते.अनेक व्यक्तिंच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू अधोरेखित करते.एक दमदार कथालेखक ज्याला सत्याची किनार आणि विचारांचे पैलू आहेत.त्यांच्या कथा म्हणजे हास्यमस्करी करत मनातलं शल्य व्यक्त करते.तेच वाचकांच्या काळजात घुसते आणि मनाला चटका लावून जाते.अन् असंच जीवन असतं हे नकळतपणे समजते.व्यक्तींच्या आचार विचारांच्या पध्दतीला व.पु.काळे ‘पॅटर्न’ ...

पुस्तक परिचय क्रमांक:२६१ खुर्द आणि बुद्रुक

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२६१ पुस्तकाचे नांव-खुर्द आणि बुद्रुक  लेखक: रवींद्र जोशी  प्रकाशन-अनुबंध प्रकाशन,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती- प्रथमावृत्ती ४डिसेंबर,२०११ पृष्ठे संख्या–२१२ वाड़्मय प्रकार-कथासंग्रह किंमत /स्वागत मूल्य-२००₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २६१||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव-खुर्द आणि बुद्रुक  लेखक: रवींद्र जोशी  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 ‘खुर्द आणि बुद्रुक’असं या पुस्तकाचे नाव वाचून आपणाला एखादं गाव वैशिष्ट्यपूर्ण कसं असतं? तसेच ग्रामीण भागातील जुळ्या गावांची माहिती देणारं पुस्तक असेल असं मुखपृष्ठावरुन वाटतं.पण मित्रहो,तसं नाही.शब्दश:अर्थ खुर्द म्हणजे गावकुसाबाहेरील वस्ती तर बुद्रुक म्हणजे मुख्य गावठाण.या पुस्तकाचे  ‘खुर्द आणि बुद्रुक’शीर्षक ख्यातनाम चित्रपट निर्माते व लेखक रवींद्र जोशी यांनी त्यांच्या सहवासातील माणसांची शब्दचित्रे रेखाटली आहेत.त्यांचे अनेक कथासंग्रह प्रकाशित असून दैनिके, दिवाळी अंक आणि नियतकालिकात संगीत विषयक लेख प्रसिद्ध झाले आहेत.   आजवर...