सेवा गौरव सौ.सविता सुनील नेमाडे मॅडम

🍁🌹सेवागौरव🍁🌹 *ओझर्डे गावच्या माहेरवाशीण अन् जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेंदूरजणेच्या आदर्श शिक्षिका, विद्यार्थीप्रिय अध्यापिका सौ. सविता सुनील नेमाडे मॅडम ३१ मार्च २०२५रोजी नियतवयोमानाने शैक्षणिक सेवेतून सेवापुर्ती झालेने सेवानिवृत्त होत आहेत.त्यांना सेवापुर्तीच्या हार्दिक शुभेच्छा🌹 नेमाडे बाई आमच्या हर्षदाच्या वर्गशिक्षिका. त्यावेळी आम्ही बालनाट्य स्पर्धेसाठी बसविले होते.त्याचे संहिता लेखन आणि दिग्दर्शन बाईंनी केले होते.त्यावेळी उत्कृष्ट वेशभूषा आणि अभिनयाचे बक्षीस आमच्या मुलांना मिळाले होते.त्यांनी ओझर्डे शाळेचा गुणवत्तेचा दर्जा उंचावण्यासाठी सहकार्य केले होते.वर्गातील शैक्षणिक तक्ते व साहित्य त्या स्वत:बनवत.तसेच त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या खो-खो खेळाडू म्हणून महाविद्यालयीन जीवनात ओळख उठावदार केली आहे.त्यांचे मातापिता प्राथमिक शिक्षक असल्याने शैक्षणिक सेवेचे बाळकडू त्यांना मिळाले. सेवेतील सर्व शाळांमधील मुले गुणवत्ता धारक कशी होतील यासाठी त्या मेहनत घेत.आज त्यांचे अनेक विद्यार्थी उच्च पदस्थ आहेत. त्यांच्या परिवाराची शैक्षणिक सेवेची ...