वनराई बंधाऱ्याची मोहीम फत्ते..
मोहीम फत्ते शाळेत शिकलेल्या कार्यानुभवाचा उपयोग प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केला वनराई बंधारा बांधून ….अशा विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो.. जिल्हाधिकारी सातारा आणि कृषी विभागाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कोंढावळे येथील बावीच्या ओढ्यावर शेतकरी, ग्रामस्थ, शिक्षक, ग्रामसेवक, कृषीसेवक, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी आणि महिलांचे मदतीने ३०फुट लांबीचा वनराई बंधारा ऑक्टोबर २०२३मध्ये उभारला होता.त्यावेळी हा बंधारा उभारण्याचा हेतू मुख्याध्यापक आणि कृषीसेवक यांनी सांगितला होता.आपणही आपल्या शेताजवळ घराजवळील वहाळी नाल्यांवर दगडमातीचे ढीग रचून वनराई बंधारे शिवारात उभारुन शकता…. मुले अनुकरणीय असतात.हेच प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.जिल्हा परिषदेच्या कोंढावळे प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या सिध्देश, विघ्नेश आणि श्रेया या तीन मुलांनी. सुट्टीच्या दिवशी घरची जनावरं चारायला घेऊन जाण्याचं काम मुलांना करावं लागायचं. गुरांना चरायला लावून काहीतरी खेळ खेळायची संधी सोडतील ती मुलं कुठची? असाच खेळ खेळून झाल्यावर एक दिवशी ...