पुस्तक परिचय क्रमांक:१४४रुजवाई

वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१४४ पुस्तकाचे नांव-रुजवाई लेखिका- प्रा.मीनल येवले प्रकाशक- गौरव साहित्यालय , सोलापूर प्रकाशन वर्ष व आवृत्ती-ऑगस्ट २०२२ प्रथमावृत्ती पृष्ठे संख्या–१७६ वाड़्मय प्रकार-ललित कथासंग्रह किंमत /स्वागत मूल्य--३५०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १४४||पुस्तक परिचय रुजवाई लेखिका: प्रा.मीनल येवले ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾 स्वता: जगलेलं-भोगलेलं मांडणं या अवघड कामाचे शिवधनुष्य मनभावन शब्दांतून लेखिकेने 'रुजवाई'त गद्याचा नवा आयाम ठसविला आहे.शब्दांची रचना अतिशय क्रमबध्द लयीत आशयगर्भित भावस्पर्शी शब्दसाजात चितारली आहे. प्रस्तावना ते लेख वाचताना मंत्रमुग्धता होते.इतकी भावस्पर्शी आणि अलवार लेखन शैली आहे.शब्दांचे बीज रुजून कथेची निर्मिती कशी होते ते उमगतं. दुखरे सल उरात घेऊन आतली हिरवी गजबज शाबूत ठेवणं मोठं अवघड काम.दु:खाला कोंब फुटावेत आणि ते चहु अंगानी बहरुन यावं. याचवेळी आपण ओटी पसरून त्यालाच कवेत घ्यावं; हे अवघडंय. अवघड असतंच सत्या...