Posts

Showing posts from December, 2023

२०२३ माझा लेखाजोखा

Image
२०२३ या वर्षातील माझा लेखाजोखा !  नववर्षांत आपण शुभारंभी अनेक संकल्प मनात योजतो. काही नवीन घटना प्रसंगातून सुखदुःखाची झालर चिकटते.तर काही व्यक्तींच्या सहवासाने आनंदाचे तोरण सजते. काही संकल्प नव्याच्या नऊ दिवसाप्रमाणे तिथंच विरुन जातात तर काहींची पूर्तता कमी-अधिक होते. काही नवीन सत्कृत्ये तडीस जातात. काही ऐनवेळी सुचतात. मनातील भावनांना आकार ऊकार मकारात बांधून शब्द कागदावर उमटतात. यापैकी काही सत्कार्य आठवतील तशी शब्दातून व्यक्त करतोय..    माधवबाग आरोग्य सेवेच्या माध्यमातून उत्तम शरीरसंपदेसाठी १०किलो वजन व्यायाम,आहार, पंचकर्म आणि आयुर्वेदिक उपचारांनी कमी केले.याचं बहुतांशी श्रेय माझ्या कारभारनीला जाते.फेसबुकवर रील करायला शिकलो.   खिद्रापूर, राजापूर, नरसिंहवाडी, सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या कुरुंदवाड येथील समाधी स्थळास भेट. मेरुलिंग आणि धोमधरण पाणलोट क्षेत्रात कुटूंबा समवेत भटकंती केली. टेबललॅण्ड पठार भटकंती.श्री छत्रपती संभाजी राजे समाधी स्थळ तुळापूर व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीस भेट.अप्पूघर पुणे. सोनजाई व गणेश मंदिर मित्रांसमवेत भटकंती.श्री क्षेत्र वीर.न...

पुस्तक परिचय क्रमांक:१२९ मोबाईल माझा गुरु

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१२९ पुस्तकाचे नांव-मोबाईल माझा गुरु लेखकाचे नांव- नागेश शेवाळकर  प्रकाशक- श्री सुभाष शंकर विभूते,मासिक ऋग्वेद चिल्ड्रन रिलीफ फंड,आजरा  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-नोव्हेंबर २०२३ प्रथमावृत्ती पृष्ठे संख्या–७२ वाड़्मय प्रकार-बाल कथासंग्रह किंमत /स्वागत मूल्य--१५₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १२९||पुस्तक परिचय          मोबाईल माझा गुरु  लेखक: नागेश शेवाळकर ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾      संवादरुपाने हितगुज करणाऱ्या बालकथा संस्कारी गुणांचे आचरण कसे असावे याची शिदोरी समजावून देणाऱ्या बालकथा आहेत.      पालकांचे समुपदेशन करणारा हा कथासंग्रह आहे.हल्लीची मुलं मोबाईल शिवाय जगूच शकत नाहीत.कारण सतत त्यांना मोबाईल हवं असतो. त्यातील खेळ,गाणी, व्हिडिओ,कोडी पाहण्यासाठी ती उतावीळ झालेली असतात. त्यापायी ते तहानभूक विसरून जातात.याचं मोबाईल मुळे कैकदा नवलाईच्या घटना ही घडतात.      'मोबाईल माझा गुरु'हा बालकेंद्रित कथासंग्रह आहे...

निसर्गाच्या सान्निध्यात आनंदीआनंद

Image
निसर्गाच्या सान्निध्यात आनंदी आनंद  कोंढावळे शाळेतील खेळाडूंनी तालुका स्तरावर स्व.यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावली. *कु.तृप्ती नारायण सावंत १०० मी.धावणे द्वितीय  *विघ्नेश मधूकर कोंढाळकर १००मी.धावणे द्वितीय *अवधूत लक्ष्मण कोंढाळकर योगासने तृतीय क्रमांक *१००*४ रिले उपविजेतेपद कर्णधार सिध्देश मधूकर कोंढाळकर आणि कबड्डी,लंगडी,धावणे या स्पर्धेत सहभागी झालेबद्दल या खेळाडूंचे कौतुक शाळेतील सर्व मुलांना सामिष भोजनाची मेजवानी देऊन सेलिब्रेशन केले.यावेळी मुलांनी लोकगीतावर ठेका धरत बहारदार समूह नृत्य सादर करुन धमाल उडवून दिली.त्या परिसर भेटीचे वर्णन.... #################### यावर्षी पाऊसपाणी कमी झाल्याने ओढ्यानाल्यात वाहून गेलेल्या पाण्याच्या धारांचे वण कातळावर ठळक दिसत होते. शिवारात ज्यांच्याकडे पाण्याची सोय त्यांनी खाचरं वलवून गहू,हरभरा हिसकडला होता.कुठं कुठं जमीनीच्यावर डोकं काढलेली रोपं दिसत होती.तर कुठं चार बोटं , वीतभर उंचावलेली रोपं नजरेत भरत होती. काहीच न केलेल्या खाचरात मात्र रान गवतानी हिरवी पिवळीकाळी रंगावली रेखाटली होती.चिबडाची खाचरं  येणाऱ्या जाणा...

आपुलकीची नाती वाढवतेय वाचन साखळी

Image
📓📚📖📓📚📖📓📚📖📓📚📖  आपुलकीची नाती वाढवतेय वाचन साखळी      मित्रहो नमस्कार, आमच्या समूहातील आदरणीय संयोजक, सदस्य आणि मार्गदर्शक स्वत:च्या पदप्रतिष्ठेचा कोणताही अभिनिवेश न बाळगता दिसेल ते, पडेल ते,सुचवेल ते आणि सांगेल ते काम करत ‘कमी तिथं आम्ही ‘या उक्तीने कामं करणारे समस्तजण वाचन साखळी समूहाच्या वाचनरथाचे सारथी..... त्यांच्या मदतीला सहकार्याला सलाम! निमित्त होते वाचनयात्री पुरस्कार प्रदान आणि पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे.खरोखरच पुस्तकांच्या सान्निध्यात रममाण होणारे रसिक वाचक आणि शब्दप्रभूंची उपस्थिती वाचन साखळीच्या संयोजिका प्रतिभाताईंनी एका पुस्तकाच्या पानात स्नेहबंधांनी बांधलीय.कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी,उत्कृष्ट परिचयक आणि वाचनयात्री असे सगळेच साहित्ययात्री; कारण त्यांनी आपल्या विचारांचे सौंदर्य अनेक साहित्य कृतीतून व्यक्त केलेय. परिसरातील घडामोडीवर आपल्या लेखन शैलीने सदर लेखन करुन ते दैनिकातून प्रसिद्ध करत करत पुस्तक रुपाने सर्जनशील साहित्य प्रकाशित केले आहे. काहींचे एखादं, दुसरं, तिसरं पुस्तक प्रकाशित झाले आहे तर काहींनी पुस्तकांची पंचविशी साजरी केली अस...

पुस्तक परिचय क्रमांक: १२८ सत्तांतर

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१२८ पुस्तकाचे नांव-सत्तांतर लेखकाचे नांव- व्यंकटेश माडगूळकर  प्रकाशक- मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण जुलै २०२० पृष्ठे संख्या–६२ वाड़्मय प्रकार-लघु कादंबरी  किंमत /स्वागत मूल्य--९०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १२८||पुस्तक परिचय          सत्तांतर लेखक: व्यंकटेश माडगूळकर  ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾 कथामहर्षी जेष्ठ कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर यांची 'साहित्य अकादमी'चे पारितोषिक प्राप्त 'सत्तांतर'कादंबरी वेगळ्या धर्तीची आहे. 'संघटित राहण्यासाठी खऱ्या व काल्पनिक अशा शक्तीची धास्ती असावीच लागते.या बीज विचारांचा गाभा असलेली सत्तांतर कादंबरी आहे.'   पक्षी-प्राणी शास्त्रज्ञ तथा अभ्यासक निरीक्षणे नोंदवत असतात. हे अवलिया  संवेदना आणि ध्यास जपणारे असतात. रानावनात तासनतास एकाच जागी बसून ते टेहळणी वजा निरीक्षणे करत असतात. कित्येक मैल जंगलातील अनवट वाटा तुडवत निरीक्षणे नोंदवत असतात.त्याच नि...