Posts

Showing posts from November, 2023

सेवापुर्तीच्या हार्दिक शुभेच्छा जरंडे बापू

Image
🍁सेवापुर्तीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹 आमचे सन्मित्र श्रीमान उत्तम सखाराम जरंडे मुख्याध्यापक प्राथमिक शाळा आसरे आज नियत वयोमानानुसार ३८वर्षांच्या शैक्षणिक सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.निसर्गाचे वरदान लाभलेल्या वाई तालुक्याच्या पश्चिमेस धोम धरणाच्या अवतीभोवतीचा जलाशय, रायरेश्वर डोंगररांगेतील हिरवीगर्द वनराई आणि अन् त्यामधील पायथा,माची ते माथा वसलेल्या गावात पायवाटेने पोहचतो.अशा छोटेखानी वाडीवस्तीच्या गावागावात जरंडे बापूंनी ज्ञानार्जन केले.सेवेचा श्रीगणेशा स्वग्राम जवळील जीवन शिक्षण विद्यामंदिर खावली येथे झाला. तदनंतर घेराकेंजळ, बारसेवाडी सारख्या दुर्गम भागातील एकशिक्षकी शाळेत झाली. वडवली पुन्हा खावली, कुंभरोशी (महाबळेश्वर) आणि आसरे येथे ज्ञानार्जन करण्याची संधी मिळाली.आपल्या विनम्र,शांत,मितभाषी स्वभावाने, विद्यार्थी प्रियतेने आणि अध्यापन कार्य कौशल्याने सेवेतील शाळांचा चेहरामोहरा सहकारी शिक्षक,विद्यार्थी आणि पालकांच्या सहकार्याने बदलला.खावली येथे त्यांनी परसबाग पालेभाज्या फळभाज्या आणि मनमोहक फुलांनी बहरवलेली होती.परसबागेतील फळभाज्यांचा उपयोग पोषण आहारातील मेनू चवदार बनविण्यासाठी केला जात...

गमभन दिवाळी अंक...

Image
'गमभन २०२३' दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली काव्यरचना 'वाट' शिक्षण विभाग पंचायत समिती, वाई आयोजित अध्यापक आणि बालकांच्या लिखित अभिव्यक्तीला आणि अनुभवांना शब्दबद्ध करण्याची संधी 'गमभन' या दिवाळीतून लाभली.अनेकाविध विषयातून मनभावन विचारांचे सौंदर्य सर्जनशीलतेने शब्दरुपात आविष्कारले आहे. लिहित्या हातांना प्रेरणा आणि आत्मबळ देण्याचे मौलिक कार्य अशा उपक्रमांतून घडतेय.दिवाळीत फराळाच्या मेजवानी सोबत रसिक वाचकांना शब्दांच्या रंगावलीतील  काव्यरचना आणि स्वानुभवाने गुंफलेले लेख रसग्रहण करायला प्रसिद्ध केले आहेत.संकल्पक ,कल्पक व प्रेरक, संपादक, संपादक मंडळ, मार्गदर्शक, नवसाहित्यिक या सर्व मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन! 🌹 सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.....

सेवागौरव सोहळा श्री.राजेंद्र गायकवाड

Image
सेवागौरव सोहळा  श्री राजेन्द्र गायकवाड केंद्रप्रमुख बावधन. संथ वाहणाऱ्या कृष्णेच्या काठी जमले समस्त ज्ञानरथाचे यात्री  जुळून आली आपुलकीची नाती गायकवाड सरांची आज सेवापुर्ती निरोप समारंभ नव्हे हा तर ओलावा माणूसकीचा विसरू कसे आम्ही क्षण हा सौख्याचा हरेक शिक्षक सेवानिवृत्त होतच असतो पण त्यांनी दिलेली शिकवण आणि वारसा प्रत्येक विद्यार्थ्यांसह कायम जपला जातो.  सेवाप्रारंभ आणि सेवापुर्ती या दोन शब्दांमधील यशस्वी वाटचाल म्हणजे आपण शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घकाळ केलेली तपस्या...* स्कूलमास्तर,अध्यापक,पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक ते केंद्रप्रमुख असा शैक्षणिक व प्रशासकीय वाटचाल करीत ३८वर्षाच्या प्रदीर्घ ज्ञानसेवेतून शिक्षकमित्रवर्य श्रीमान  राजेंद्र गायकवाड केंद्रप्रमुख पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. जीवनातील वसंत हा अनुभवांचा प्राजक्त सडा… हजरजबाबी आणि अभ्यासूवृत्तीचा घेऊ आम्ही धडा… आरोग्य संपदा तुम्हाला लाभो हीच मनापासून सेवापुर्तीची शुभेच्छा…. सूर्याचे हृदयही पाघळते दिवस मावळत आल्यावर कठोर मनेही हळवी होतात सेवापुर्ती नजीक आल्यावर खुबी माझ्यात एवढी ना...

पुस्तक परिचय क्रमांक:१२७ वाचिक अभिनय

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१२७ पुस्तकाचे नांव-वाचिक अभिनय लेखकाचे नांव- डॉक्टर श्रीराम लागू प्रकाशक- राजहंस प्रकाशन, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-फेब्रुवारी २०१७/ आठवी पृष्ठे संख्या–९४ वाड़्मय प्रकार-ललित किंमत /स्वागत मूल्य--१२०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १२७||पुस्तक परिचय          वाचिक अभिनय लेखक: डॉक्टर श्रीराम लागू  ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾 "बोलण्यात नेमस्तपणा ठेवला म्हणजे भाषण चित्तवेधक होते."     आपल्या बोलण्याला कसा आकार द्यायचा,हे सहज सुंदर शब्दात पण आवश्यक तो तांत्रिक नेमकेपणा साधून; तो समजावण्यासाठी या पुस्तकात 'नैसर्गिक अभिनयाचे मास्टर' अभिनय सम्राट  डॉक्टर श्रीराम लागू यांनी काही युक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या आहेत. 'वाचिक अभिनय' हे खऱ्या अर्थाने आपला आवाज अभिनयासाठी कसा स्पष्ट आणि शुध्द असावा.याची कार्यशाळाच जणू या पुस्तकातून घडत जाते.प्रत्येक अक्षराचे उच्चारशास्त्र समजावून सांगितले आहे. आवश्यक तिथे वैज्ञानिक माह...