Posts

Showing posts from October, 2023

प्राथ.शाळा: कोंढावळे वर्धापनदिन स्नेहमेळावा

Image
घंटा वाजली शाळा भरली.अन् स्नेहमेळाव्याची तासिका सुरू झाली…… आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा ६९वा वर्धापनदिनाचा स्नेहमेळावा  १९५४ साली शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांना सन्मानित करुन साजरा करण्यात आला.    गावचे वैभव जसे देवालय त्याचप्रमाणे गावची शान विद्यालय असते.ज्ञानाने माणसाची इमेज निर्माण होते.या प्राथमिक शाळेत तुम्ही शिकून लहानाचे मोठे झालात.अवगत केलेल्या ज्ञानाची शिदोरी घेऊन जगाच्या बाजारात उदरनिर्वाहासाठी जावं लागतं.तुम्ही यशस्वीपणे जीवन जगत आहात.तुमच्या क्षेत्रात भरारी घेण्यासाठी  तुम्हाला ज्ञानच उपयोगी पडले.ज्ञान हे त्रिकालात चिरंतर असते.शाळेतील दिवसात आपण केलेल्या खोड्या,खाल्लेला मार, अभ्यास न केलेबद्दल दिलेली शिक्षा, खेळाच्या स्पर्धेतील गमतीजमती, सांस्कृतिक कार्यक्रमातील बहारदार नृत्याभिनय, वनभोजन करताना उडालेली भंबेरी, भाषण करताना  झालेली अवस्था,शाळेला मारलेली दांडी कारण सांगताना दिलेली थाप,परिपाठ आदी गोष्टी आठवतात. मोठ्या अभिमानाने त्याबद्दल आजमितीला गप्पा मस्करीत चर्चा करतो.आज काहीवेळ ते क्षण पुन्हा वर्गात बसल्यावर आठवले.'पंचवीस वर्षांनंतर आज आम...

कोंढावळे शाळा वर्धापनदिन

Image
कोंढावळे शाळेचा आज ६९वा वर्धापनदिन त्यानिमित्ताने… १९५४ पासून आजपर्यंत जीवन शिक्षण विद्यामंदिरात शिक्षण घेऊन जीवनात भरारी घेवून संसारात रमलेल्या विद्यार्थी पालकांना आणि  ज्ञानकण वेचणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांना……आपल्या प्राथमिक शाळेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा!🌹 केवढा भाग्यवान सुदिन.आजोबा, मुलगा आणि नातू असं तिनं पिढ्यांचे शैक्षणिक नातं जपणारी आपली प्राथमिक शाळा. आज शाळा ६९ वर्ष पूर्ण करून ७०व्या वर्षात पदार्पण करतेय.  सह्याद्रीच्या महाबळेश्वर आणि रायरेश्वर डोंगररांगेच्या मधोमध असलेल्या कोळेश्वर डोंगररांगेच्या पायथ्याला निसर्ग सौंदर्याने नटलेलं कोंढावळे गाव. तिन्ही बाजूंनी डोंगराचा वळसा तर एका दिशेला साखरनळीचाओढा. शूरवीर संभाजी कावजी कोंढाळकर यांचे ऐतिहासिक  गांव.गावचं ग्रामदैवत श्री सालपाई देवी. गावचा प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा आपणाला तिथं दिसणारे वीरगळ,नंदी, पिंड आणि अनेक जुन्या मुर्तींवरुन उमजते. देवालयाच्या सान्निध्यातच गावचे प्राथमिक विद्यालय. शक्तीभक्तीच्या उपासनेचे देवालय तर ज्ञानोपसानेचे विद्यालय. दोन्ही मंदिरे गावच्या संस्कृतीक ऐश्वर्याचे प्रतिबिंब अधोरेखित करतात.....

वनराई बंधारा.....

Image
कोंढावळे येथे श्रमदानातून उभारला वनराई बंधारा.. ...  वाई : यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.भविष्यात शेती आणि पिण्यासाठी पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून गावातील ओढे ओहळीवर गरजेप्रमाणे छोटेखानी वनराई बंधारे बांधून जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत जिरवून पाणीसाठा वाढविणे गरजेचे आहे .यासाठी  जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन वाई तालुक्यातील दुर्गम भागातील कोंढावळे येथील बावीच्या ओढ्यावर  महाराष्ट्र शासन कृषी विभाग,शेतकरी, ग्रामपंचायत, प्राथमिक शाळेतील बालचमू, अंगणवाडी सेविका, महिला मंडळ,युवा कार्यकर्ते, कृषी कर्मचारी, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रमदानातून सुमारे ३० फुट लांबीचा वनराई बंधारा  बांधण्यात आला. सहकार्यातून अनेक चांगली कामे घडू शकतात.केवळ दोन तासांच्या श्रमदानातून हा बंधारा बांधला गेला. यामुळे पाण्याची पातळी तीन फुटांपर्यंत वाढली. हे काम पुर्णत्वास नेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी श्री प्रशांत शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी पर्यवेक्षक श्री सोमनाथ पवार,श्री प्रशांत सोनावणे साहेब,श्री सुनिल जाधव,श्री रवींद्रकु...

आई माझे दैवत

Image
आई माझं दैवत!     साठवणींचा झोका…..आठवणींचा झरोका… तुझं असणं आमच्यासाठी सर्व काही होतं.ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होतं.आज सर्व काही असण्याची जाणीव आहे.पण आई तू नसणे हीच मोठी उणीव आहे. माझी आई सौ.यमुनाबाई गणपत लटिंगे. कृष्णा-कोयनेच्या प्रिती संगमावर वसलेल्या कराड नगरीची माहेरवाशीण. सौ. शकुंतला आणि श्री.बापूजी मारुती जठार यांची जेष्ठ कन्या. सन १९६६ साली हायवेपासून तीन किमीवर असलेल्या ओझर्डे गावातील तुकाराम बाळा लटिंगेंची सून झाली.रहातं घर,हातमाग,पानाचीगादी (पानपट्टीचे दुकान) आणि सायकल ही त्यांची त्यावेळची स्थावर व जंगम मालमत्ता.आजोबा दररोज गावोगावी साडीधोतर विक्रीसाठी फिरायचे आणि वडील भुईंज येथील धान्य मार्केटला कामाला जायचे.तर आईकडं घराची जबाबदारी असायची .  आमच्या घरी हातमागाचा सांगाडा होता. त्याचे दसरादिवाळीला पूजन केले जायचे. आजोबा आणि वडिल आम्हाला  सांगायचे की,''आपला पारंपरिक व्यवसाय हातमागावर साड्या धोतरं कापड विणणे आणि बाजारच्या गावी जाऊन विक्री करणे."नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करता न आल्याने उद्योग धंदे, व्यापारात मंदी आल्यामुळे वडीलांचे  ...

पुस्तक परिचय क्रमांक:१२६चेस युअर ड्रीम्स

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१२६ पुस्तकाचे नांव-चेस युअर ड्रीम्स  लेखकाचे नांव- सचिन तेंडुलकर सहलेखक::बोरिआ मजुमदार अनुवाद –दीपक कुलकर्णी  प्रकाशक- मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-नोव्हेंबर २०१८/ प्रथमावृत्ती पृष्ठे संख्या–२३० वाड़्मय प्रकार- आत्मकथन  किंमत /स्वागत मूल्य--२९५₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १२६||पुस्तक परिचय          चेस युअर ड्रीम्स  लेखक: सचिन तेंडुलकर  ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾 भारतीय क्रिकेट जगताचा दैवत महानायक विक्रमादित्य भारतरत्न सचिन तेंडुलकर,स्वतःच्या क्रिडा जीवनाचं अंतरंग निर्भिडपणे व प्रामाणिकपणे उलगडून दाखविणारा क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू  """""""""""""""""""""""""""""" """"""""""""""""""" """...