Posts

Showing posts from September, 2023

प्रथम पुण्यस्मरण दिन ऊनसावली पुस्तक प्रकाशन

Image
प्रथम पुण्यस्मरण (वर्षश्राध्द) मातोश्री यमुनाबाई गणपत लटिंगे ओझर्डे वाई यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त बुधवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी'ऊनसावली'स्मरणगंध स्मरणिकेचे प्रकाशन पिताश्री गणपत तुकाराम लटिंगे,सौ पारुबाई धेडे(मावशी),श्रीमती तारुबाई चौधरी (मावशी), श्रीमती मालन मर्ढेकर (मावशी), श्रीमती मीना डांगरे (मावशी) ,श्री धनंजय जठार (मामा), श्री.दिनेश गणपत लटिंगे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.तसेच या कार्यक्रमाचे अवचित्य साधून आमच्या साळी समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री जिव्हेश्वर. या मंदिराच्या (साळीतीर्थ) व सांस्कृतिक भवनाच्या बांधकामास लटिंगे परिवाराच्या वतीने ₹२११११ देणगी प्रदान करण्यात आली.आयोजित धार्मिक वर्षश्राध्दाच्या कार्यक्रमास  पैपाहुणे, नातलग,इष्ट मित्र मंडळी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. भावपूर्ण श्रद्धांजली!!! अभिप्राय ..... श्री. रविंद्रकुमार गणपत लटिंगे व श्री.दिनेश गणपत लटिंगे रा. ओझर्डे यांनी श्री जिव्हेश्वर सामाजिक विकास संस्था, ओझर्डे या संस्थेच्या श्री जिव्हेश्वर मंदिर व सांस्कृतिक भवनाच्या बांधकामास आज रोजी त्यांच्या मातोश्री कै. सौ.यमुना गणपत लटिंगे यांच्...

क्रिडा साहित्य वाटप

Image
🎖️🏅🥇 हार्दिक अभिनंदन!!! 'सिंपल स्टेप्स ' या ध्येयाने प्रेरित होऊन स्वतःच्या आनंद आणि आरोग्यासाठी दररोज आपण धावूया..... हा संदेश देणारे धावपटू श्रीमान आशिष कसोडेकर,पुणे यांनी मॅरेथॉन स्पर्धेत जागतिक स्तरावर रेकाॅर्डब्रेक कामगिरी केली आहे. पन्नास वर्षांच्या या अवलियाने भारताच्या शहात्तराव्या वर्धापनदिनानिमित्त केरळ ते लडाख अशी ७६ दिवसांची मॅरेथॉन पूर्ण केली आहे.१जूनला केरळ येथून शुभारंभ करुन १५ ऑगस्ट यादिवशी लडाख येथे त्यांनी ध्वजारोहण केले.अशी अलौकिक कामगिरी करून भारताचे नाव जगात उंचावले.यापूर्वी त्यांनी सलग ६०दिवस धावून  मॅरेथॉन पूर्ण केली आहे.दररोज ते ४२किमी धावायचे.या दैदिप्यमान ऐतिहासिक कामगिरीनिमित्ताने ७६ क्रिडा साहित्याच्या कीटचे वाटप त्यांनी केले.या कार्याची शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन स्वतःचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी करावे.      शतकोत्तर रौप्यमहोत्सवी श्री मधली आळी गणेशोत्सव मंडळ,वाई यांनी या धावपूटचा गौरव केला. त्यावेळी वाशिवली, वडवली आणि कोंढावळे या दुर्गम भागातील शाळांना क्रिडासाहित्याच्या कीटचे वाटप जननायक आमदार मकरंद पाटील, धावपटू आशिष कसोडेकर...

पौष्टिक तृणधान्यं पाककृती शाळा कोंढावळे

Image
    कोंढावळे शाळेत पाककृती स्पर्धांचे आयोजन   दुर्गम भागातील नाचणी या तृणधान्याचे विविध पदार्थ बनवून ''पोषण पंधरवडा साजरा करण्यात आला.'' बदलत्या जीवनशैलीत जंकफूड खाण्याच्या सवयीमुळे आपल्या दैनंदिन आहारामध्ये पौष्टिक तृणधान्यांचा वापर दिवसेंदिवस कमी होतोय.पौष्टीक तृणधान्यातून रोजच्या ऊर्जेची गरज भागविण्यासाठी आपण भोजन अल्पोपहार करत असतो.आपला आहार कर्बोदके,प्रथिने आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध असणे आवश्यक आहे.शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना तृणधान्ययुक्त आहाराची सवय लागावी म्हणून 'प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण'योजने अंतर्गत विद्यार्थी व पालकांमध्ये तृणधान्यांविषयी जागरूकता निर्माण करणे विषयी *पोषण पंधरवडा* निमित्त आज शुक्रवार दिनांक ८/ ९/ २०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढावळे,ता.वाई येथे 'पौष्टिक तृणधान्यांवर आधारित पाककृती' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अंगणवाडी व इयत्ता पहिली ते सातवीतील ४५ विद्यार्थ्यांच्या पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन विविध प्रकारच्या पाककृतींचे पदार्थांचे सादरीकरण केले. सदर स्पर्धेस शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी  के...

पुस्तक परिचय क्रमांक:१२५ क्रिकेटच्या ऐश्वर्या

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१२५ पुस्तकाचे नांव-क्रिकेटच्या ऐश्वर्या   लेखिकेचे नांव-निता चापले  प्रकाशक- ग्रंथाली प्रकाशन, मुंबई  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-नोव्हेंबर २०१६/ प्रथमावृत्ती पृष्ठे संख्या–१०३ वाड़्मय प्रकार- चरित्र माहितीपट किंमत /स्वागत मूल्य--१५०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १२५||पुस्तक परिचय           क्रिकेटच्या ऐश्वर्या  लेखिका: निता चापले  ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾🎋🌾🍃 महिला क्रिकेटच्या खेळाडूंचे स्कोअरिंग या पुस्तकात प्रस्तुत केले आहे. २०-ट्वेंटी क्रिकेट वर्ल्डकप मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पहात असताना, टाळ्यांचा कडकडाट,शिट्ट्यांचा गजर, अमाप उत्साहात चेअरप देणारे प्रेक्षक, आणि विराट हार्दिक दिनेश आणि अश्विन यांनी बहारदार बॅटिंग करुन शेवटच्या षटकात एका षट्काराने सामना भारताच्या बाजूने झुकविला.आणि हा  सामना विराट कोहलीने भारतास जिंकून दिला.देशात गल्लोगल्ली जल्लोषात हा विजय साजरा झाला.या बहारदार रोमांचकारी ख...