Posts

Showing posts from August, 2023

जिव्हेश्वर जन्मोत्सव सन २०२३

Image
भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव वाई विविध उपक्रमांनी साजरा.... समस्त साळी समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव विविध उपक्रमांनी स्वकुळ साळी समाज बांधवांनी साजरा केला. सुर्योदयापुर्वी पूजा,पाळणा, आरती आदी कार्यक्रम संपन्न झाले. दुसऱ्या सत्रात  देशासाठी शहीद झालेल्या वीरांना व ज्ञात- अज्ञात कलाकार, समाजसेवक व समाज बांधवांना श्रध्दांजली अर्पूण जन्मोत्सव सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक सचिव श्री रवींद्र लटिंगे यांनी केले.प्रमुख अतिथी व महाप्रसादाचे मानकरी श्रीमती सरोजिनी मारुतराव हावरे , सल्लागार श्री दत्तात्रेय मर्ढेकर, भास्करराव कांबळे यांचे स्वागत अध्यक्ष श्री महेंद्र धेडे, उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर मर्ढेकर यांनी केले.तद्नंतर कलाविष्कार रेकॉर्ड डान्स दिशा कोदे, ज्ञानदा दाहोत्रे ,श्रिया दाहोत्रे यांनी बहारदार सादर केला.श्रेया पोरे हिने उत्कृष्ट वक्तृत्वाची झलक सादर केली. तदनंतर स्पर्धापरिक्षेतून  पोलिस उपनिरीक्षक व राज्यकर निरीक्षकपदी निवड झालेले  श्री मयूर प्रमोद गवते ओझर्डे ,आदर्श धन्वंतरी पुरस्कार विजेते डॉ.श्रीकांत तांबे , शास्त्रीय संगीत ग...

भटकंती सोनेश्वर ओझर्डे नदीचा प्रवाह

Image
कृष्णानदीच्या पात्रातील कातळाचा नैसर्गिक आविष्कार....कातळशिल्प सोनेश्वर ओझर्डे वाई येथे कृष्णानदीचे पात्र कातळावरुन प्रवाहित होताना खळाळता नाद आपणाला मंत्रमुग्ध करतो. अन् आपली पाऊलं आपोआप तिकडे त्या आवाजाच्या दिशेने वळतात. तिथली प्रवाहित जलधारा पाहताना  मन ओलेचिंब होवून जातं. त्याचवेळी तेथील सभोवतीचा खडक आणि खडकातील विविध आकार मनाला भुरळ घालतात.तो प्रवाह खडकावरुन आणि काठावरुन पुढे जाताना पाण्याच्या सततच्या प्रवाहामुळे,घर्षणामुळे पाणी भोवऱ्यासारखे फिरुन  पुढे जाते असते.तिथल्या नदीपात्रातील खडकाला छोटेमोठे  कुंडासारखे लांबट गोल आणि  खोलगट खळगे कमीअधिक  खोलीचे पडलेले आहेत .ते बघताना उत्सुकता शिगेला पोहोचते तर  कुतूहल निर्माण होते. जणू काही लाकडावर रंधा फिरवल्याने गुळगुळीत मुलायम स्पर्श लागतो.तसेच इथल्या कातळावरुन हात फिरवल्याने जाणवते. काठावरील खडकाच्या दोन्ही बाजूला आणि जलप्रवाह धारेत वेगवेगळे आकार विशेषतः रांजण, उखळ,खड्डे, पाण्याची खोलगट धार अथवा ओहळ या रुपात दिसतात. ते बघताना निघोज येथील कुकडी नदीच्या पात्रातील कातळशिल्पाची आठवण येते.त्याच पध्दतीचे छोटेमोठे...

पुस्तक परिचय क्रमांक:१२४चंद्राचा रथ

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१२४ पुस्तकाचे नांव-चंद्राचा रथ   कवयित्रीचे नांव-लतिका चौधरी  प्रकाशक- दिशोत्तम प्रकाशन, नाशिक  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-ऑक्टोंबर २०१७/ प्रथमावृत्ती पृष्ठे संख्या--५९ वाड़्मय प्रकार- बालसाहित्य काव्यसंग्रह  किंमत /स्वागत मूल्य--६०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚 १२४||पुस्तक परिचय           चंद्राचा रथ कवयित्री: लतिका चौधरी  ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾🎋🌾🍃 सत्यम् शिवम् सुंदरम् हा आरसा कवीचा जे न देखे रवी तेथे मात्र  जाई कटाक्ष कवीचा कवी शब्दरत्नांचा सागर कवी भांडवलाची घागर….  'कवी' या नामाच्या कवितेतील वरील ओळी कवीच्या मनातील भावना आणि उमाळा यथार्थ शब्दात प्रगल्भता स्पष्ट करतात.ही कविता आहे,लतिका चौधरी यांच्या 'चंद्राचा रथ ' या बालकाव्यसंग्रहातील.सहज सुलभ मनाचा स्वाभाविक हुंकार म्हणजे 'चंद्राचा रथ' हा काव्यसंग्रह आहे. हा बालकाव्यसंग्रह वाचन साखळी समूहाच्या संयोजिका प्रतिभाताई लोखंडे यांनी आयोजित केल...