Posts

Showing posts from July, 2023

सृष्टीचे मनभावन सौंदर्य

Image
सृष्टीचे अप्रतिम सौंदर्य.... हिरव्या कोंदणात सजलंय. चला मनसोक्त झिम्मड पाऊसात ओलंचिंब होऊया.. सह्याद्रीच्या कुशीत अवतीभवतीच्या गडदुर्ग, डोंगरदऱ्या, टेकड्या, प्राचीनतम मंदिरे, घाटमाथे, झरे,धबधबे,ओहळ, ओढे,नद्या, शेतशिवार, घनश्यामल ढगांचे बरसणं, धुक्याचे डोंगराला धूसर करणं आणि हिरव्यागार झाडीवेलीतून डोकावणारी कौलारू घरांची वाडी यांनी मिळून तयार झालेला कॅनव्हास तनमनाला मनमोहित करून अमाप ऊर्जेचा उत्साह निर्माण करतो.हिरव्याच रंगाच्या गडद फिक्कट छटा आणि दरीतून  खळखळ वाहणारे शुभ्र दुधाळ जलधारा पाहताना मनस्वी आनंद ओसंडून वाहत जातो.हेच सृष्टीचे साजिरे रुप प्रत्यक्ष पाहताना आनंद गगनात मावेनासा होतो.निसर्गाच्या सहवासात लय भारीच वाटते.        स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आठवण करून देणारे गडकिल्ले  असोत नाहीतर तृणवेली आणि झाडाझुडुपांनी संभारलेली टेकडी असो अथवा खळखळ वाहणारा पांढरेशुभ्र जलप्रवाह असो. नाहीतर गावाजवळील माळरानं गायरानं अथवा शिवार असो.अशा नयनरम्य स्थळी आपली पाऊलं आपोआप अनवट वाटेने फिरायला उत्सुक होतात.कधी एकदा धबधब्याखा...

हसरा नाचरा जरासा लाजरा.....

Image
हसरा नाचरा जरासा लाजरा श्रावण आला..... बालपणीच्या आठवणी       हसऱ्या नाचऱ्या श्रावणी…... श्रावणात  निसर्गाचं हिरवंगार रुप दिसतं जणू काही सृष्टीने हिरवा भरजरी शालू नेसून सजलेली दिसते...उन् पावसाचा खेळ सुरू असतो.शिवार हिरवाईने नटलेलं असते.ओहळ,ओढे नद्या तुडुंब भरून वाहत असतात.आमच्या चंद्रभागेच्या ओढ्याला ही पूर आलेला असतो.पुलाखालील खडकावरुन पाणी खळाळत उड्या मारत असतं.तोच पाहिलेला पहिला धबधबा…पुलावरून किंवा काठावरुन बघायला लय मजा वाटायची.अगदी धारेच्या जवळ जावून पांढरेशुभ्र तुषार अंगावर घ्यायला मन अधीर व्हायचं.यथेच्छ सर्वांग ओलंचिंब व्हायचं.शिवारात नवचैतन्य नांदत असतं.शिवारातली  पीकं फुलोऱ्यात यायला सुरुवात झालेली असते.धार्मिक व्रतवैकल्ये करण्याचा अग्रणी मास.उपास करुन मन शुध्दीकरण करण्याचा महिना. सणांची नुसती रेलचेल असते.श्रावण महिन्यात बहुतांशी भाविक सोमवार किंवा शनिवार उपवास करतात.नागपंचमी, शिराळशेट,नारळी पौर्णिमा, दहिहंडी, गोपाळकाला,श्री भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव आणि बहिण भावाच्या अतूट नात्याचा रक्षाबंधन सोहळा अशा सणउत्सवांची या महिन्यात रेलचेल असते.तर काहींच्या ...

गुरुपौर्णिमा उत्सव

Image
           गुरुपौर्णिमा   गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः|| भारतीय संस्कृतीचं देणं आणि श्रद्धेच्या माणुसकीचं देणं म्हणजे गुरुपौर्णिमा.गुरुशिष्य परंपरेचा ऋणानुबंध दृढमूल करणारा अलौकिक उत्सव.सद्गुरु प्रति आदरपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तोच हा दिवस.आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते.भारतीय गुरुपरंपरेत गुरु- शिष्यांचा महिमा अगाध आहे. कृष्ण-सुदामा, द्रोणाचार्य- अर्जुन,संत सोपानदेव- संत ज्ञानेश्वर,रमाकांत आचरेकर-सचिन तेंडुलकर अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की,सर्वांचा माथा विनम्र झाल्याशिवाय राहत नाही. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय व वंदनीय मानले आहे. तसेच आपले कर्म करीत असताना आपले कामही कामाचा गुरु असते. सकस विचारांचे समृद्ध भांडार असणारे ग्रंथही आपले गुरू असतात. संत ज्ञानेश्वरांच्या शब...

पुस्तक परिचय क्रमांक:१२३ मराठेशाहीचे अंतरंग

Image
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚 १२३||पुस्तक परिचय           मराठेशाहीचे अंतरंग  लेखक: डॉ.जयसिंगराव पवार  ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾🎋🌾🍃 वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१२३ पुस्तकाचे नांव-मराठेशाहीचे अंतरंग  लेखकाचे नांव-डाॅ.जयसिंगराव पवार  प्रकाशक- मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-तृतीयावृत्ती/ मार्च २०१८ पृष्ठे संख्या--१३४ वाड़्मय प्रकार-संशोधनात्मक  किंमत /स्वागत मूल्य--१७०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚   महाराष्ट्राचा इतिहास व राजर्षी शाहू चरित्राचे लेखक, संपादक व संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या कलमातून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ते स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी राजे यांच्या ऐतिहासिक कालखंडानंतरच्या काळातील संशोधनात्मक मराठ्यांच्या गौरव गाथेचा ग्रंथ म्हणजे 'मराठ्यांचे अंतरंग'होय.यामध्ये महाराणी ताराबाई व छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील ऐतिहासिक घटनांचा ऊहापोह या ग्रंथात केलेला आहे.इतिहासात फारश...