Posts

Showing posts from January, 2023

काव्य पुष्प: क्रमांक २५९ वाट...

Image
वाट… . देऊळाराउळाची रांग भक्तीची वनराईची मार्गिका गारव्याची  धुळाक्षरांची दर्शिका ज्ञानाची प्रकाशाची वाट नवतेजाची  ही वाट शिवारातल्या बांधाची पण पावलांच्या वहिवाटीची चिखलात पावलं रुतण्याची धुराळ्यात ठसे उमटण्याची उन्हाळ्याच्या काहिलीत लाल धुराळा उडण्याची पावसाळ्यात निसरड्या  वाटेवरुन कधी घसरण्याची तर पाण्यात शिरुन वाट पावलं टाकत जाण्याची वाटेने तंगडतोड झाल्यावर नंतर घेणाऱ्या विसाव्याची घाटमाथ्याची वाट वळणावळणाची  द्रुतगतीवरची सुसाट पळण्याची हमरस्त्यावरची मार्गिका डांबराची पदपाथ आखीवरेखीव पेव्हरची     ती वाट हुडकत जाण्याची शोधताना मार्ग गवसण्याची  इप्सित स्थळाला भेटण्याची तनमनाला आनंद घेण्याची काही अनवटवाटा धु़ंडाळूनी वाटते अंतर मनात नवल  काही खडतर वाटा तुडवनी वाढते काळजात कुतूहल वनातल्या थरारक अनवटवाटा  भटकताना साद घालतात चित्ताला शिवारातल्या मळलेल्या पायवाटा    फिरताना भुरळ घालतात जीवाला   दमसा कराय लावतात क्षणाक्षणाला गडकिल्ल्यांच्या चढणीच्या वाटा तर उत्कंठा वाढवितात निमीषाला  शीतल गर्द छायेतल्या जंगलवा...

काव्य पुष्प:२५८ वृक्षांचे नजारे

Image
     वृक्षांचे नजारे काष्ठशिल्पी आकारात झाडं भावले  अजस्त्र आकारात अजगर दिसले  खोड अन् फाद्यांचे धुमारे वाळले  वेलींची जाळी झाडाला गुंडाळे|| हिरवी करडी शोभिवंत  काया महाकाय वृक्षाची घनदाट छाया   वेलीला बाहुपाशात करते माया  फुले ऊधळती अत्तराचा फाया|| पाचोळ्याने भरला झाडाचा तळ पिकल्या पानाची झाली पानगळ किड्यामुंग्याचे हेच आश्रयस्थळ  झाडांखाली अंथरली जणू वाकळ || लतावृक्षांचे आकार नजरती  नयनरम्य दृश्य मोहविती  गर्द छायेत पाखरं खेळती  वाटसरु क्षणभर विसाविती || श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथालय नायगाव येथील वाचनालयात पुस्तके प्रदान

Image
वाचन साखळी समूहाच्या वतीने ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मोफत ग्रंथालय नायगांव ता.खंडाळा जिल्हा- सातारा या संस्थेस वाचनालयासाठी १७५ पुस्तके प्रदान करण्यात आली.ही पुस्तके वाचन साखळी समूहाच्या संयोजिका प्रतिभाताई लोखंडे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन वाचन साखळी समूहातील नवसाहित्यिकांचे साहित्य(पुस्तके,ग्रंथ) तसेच वाचनप्रेमी सदस्यांनी स्वखुशीने वाचनालयास देण्यासाठी पुस्तके पोस्टाने,कुरियने पाठविली होती.आदरणीय प्रतिभाताईंनी जमा झालेली  पुस्तके स्पीडपोस्टाने नागपुर येथून सातारा येथे पाठविली.तेथून आमचे शिक्षक मित्रवर्य श्री प्रकाश बडदरे सरांनी स्वतः वाई येथे सुपूर्द केली.तदनंतर  रविवार दिनांक ८ जानेवारी रोजी सामाजिक कार्यकर्त्या व वाचनालयाच्या अध्यक्षा सौ.शुभांगीताई नेवसे व ग्रंथपाल सौ.नेवसे यांच्याकडे वाचन साखळी समूहाचे कार्याध्यक्ष श्री.गणेश तांबे,सौ.जयश्री तांबे मॅडम, सहसंयोजक श्री रवींद्रकुमार लटिंगे, सौ.प्रेमा लटिंगे, श्री.शेखर जाधव श्री.काशिद सर व सौ.काशिद मॅडम आणि वाचन साखळी परिवार यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आली. एका अलौकिक उपक्रमासाठी मी स्वतः २५ पुस्...

पुस्तक परिचय क्रमांक:११७ झोंबी

Image
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚 ११७||पुस्तक परिचय           झोंबी  लेखक: आनंद यादव  ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾🎋🌾🍃 वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-११७ पुस्तकाचे नांव--झोंबी   लेखकाचे नांव- आनंद यादव प्रकाशक- मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती- पुनर्मुद्रण जानेवारी, २०२२ पृष्ठे संख्या--३८२ वाड़्मय प्रकार-आत्मचरित्र पहिला खंड किंमत /स्वागत मूल्य--३७०₹ """"""""""""""""""""""""""""""" "दररोज पोटभर अन्न मिळण्यासाठी मळ्यात गुरांढोरांसारखं राबून शिक्षणासाठी केलेल्या संघर्षमय धडपडीची 'झोंबी'.... साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आत्मचरित्र 'झोंबी' सर्वात लोकप्रिय अभिजात कलाकृती शेतीशी नाळ  जपणाऱ्या साहित्यिक आनंद यादव यांची आहे."  गरिबीचे श्रीमंत शब्दचित्र उभारणारी' झोंबी' आजच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत अस्वस्थ होऊन धुम...