गरजू विद्यार्थ्यांला मदतीचा हात
सामाजिक दातृत्वाच्या कार्याचं प्रत्यक्ष दर्शन... आज मी माझ्या शाळेतील मुलांना आधारकार्ड काढण्यासाठी शहरातील एका बॅकेच्या आधारकेंद्रात घेऊन गेलो होतो.आधारकार्ड नोंदणी कुठे जावून करायची,कागदपत्रे कोणती लागतात. याचा गंधही नसलेले पालक,त्यात ते वंचित घटकातील त्यामुळे शिक्षणाची फारच अनास्था.शिष्यवृत्ती आणि शालेय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड असणे आवश्यक आहे. त्यामुळे लागणारी कागदपत्रे शाळेतच तयार करून गेले अनेक दिवस पेडिंग पडलेलं कार्य आज पुर्णत्वास गेले. आधार केंद्रावर अतिशय समंजस वृत्तीने तिथल्या ताईंनी सहकार्य केले. एका मुलाचे आधारकार्ड नोंदणी करताना त्यांचे लक्ष मुलांच्या पायाकडे गेले.त्यांंनी लगेच मला विचारणा केली.'मुलगा चपला घालून आला नाही का' ''मॅडम होती त्याच्याकडे पण ती तुटली आहे.मी जाताना त्याला घेऊन देणार आहे.'' माझं उत्तर. ''ती मुलं फारच गरीबा घरची दिसतायतं.''मॅडम अंदाजाने बोलल्या. आणि लगेच त्यांनी घरातील कोणालातरी संपर्क करुन बोलावून, त्या मुलाला रिक्षाने दुकानात नेहून त्याला नवीन चप्पल घेऊन दिली. अगोदर अनवाणी असणारा मुलगा थोड्याच वे...