Posts

Showing posts from July, 2022

काव्यपुष्प:२५७ खवय्येगिरी

Image
खवय्येगिरी  खुसखुशीत रुचकर कांदाभजीनं तुपातल्या जिलेबिला दिली हाक  जोडीला आहे रवाळ म्हैसूरपाक अन् गुलाबजामचा रसदार पाक  घोटंघोट प्यायला मसालेदार ताक  कैरीची फोड,मिरचीचा ठेचा चाख ओल्या भेळीवर जरा कांदा टाक तिखटगोडाचा जमलाय परिपाक कडकडीत खुसखुशीत बाकरवडी मसालेदार चटकदार अळूचीवडी आंबटगोड खमंग सुरळीचीवडी पचायला पित्तनाशक सोलकढी ओल्या भेळीतले शेंगदाणे चाखू बर्फीपेढ्याची चिमूठभर भर टाकू रेवडी गाठीशेवची चवच न्यारी चिरोटे अनारसेंचा आस्वाद भारी  अवीट गोडीच्या आवडत्या पदार्थांची अस्सल चव जीभेवर रेंगाळणारी मिठाईच्या प्रसिद्ध दुकानाकडे  आपोआप पावलं वळवणारी श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई

काव्यपुष्प:२५६ इंद्रधनू

Image
श्रावणातल्या ऊनपावसातील इंद्रधनूचे विलोभनीय दर्शन आज आषाढात झालं!              इंद्रधनुष्य आकार सातरंगी वर्णपटाचा  निसर्ग आहे किमयागार पिवळ्या प्रकाश किरणांचा  क्षणभर दिसे चमत्कार|| आषाढ मासातही रंगला  खेळ ऊनपावसाशी  इंद्रधनूचा गोफ विणला   कृष्णधवल अवकाशी   ||  उमटली आभाळाच्या पाटीवर  मनमोहक सप्तरंगी कमान  वाऱ्यासंगे रिमझिम पावसाचे   गायन वादन छान छान|| साज तुषार किरणांचा  उभारला  आसमानी  नजराणा इंद्रधनूचा    भुरळ घालतो मनी||

पुस्तक परिचय क्रमांक-१११ चेहऱ्यामागचे चेहरे

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य परिचय कर्ता-श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे,  वाई पुस्तक परिचय क्रमांक-१११ पुस्तकाचे नांव--चेहऱ्यामागचे चेहरे लेखकाचे नांव--महादेव मोरे प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण आॅक्टोंबर २०१६ वाड़्मय प्रकार-- व्यक्तीचित्रण,कथासंग्रह पृष्ठे संख्या-२०६ मूल्य/किंमत--२२०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚 १११||पुस्तक परिचय           चेहऱ्यामागचे चेहरे           लेखक: महादेव मोरे  ############################ तळागाळातील माणसांच्या मनाचं निरीक्षण सूक्ष्मपणे करून ग्रामीण बाजातील भाषेत लिहिलेलं शब्दचित्र म्हणजे 'चेहऱ्यामागचे चेहरे' हा कथासंग्रह आहे. समाजातील उपेक्षित वंचित घटकातील माणसांची व्यक्तिरेखा अतिशय मर्मभेदक शब्दात त्यांनी मांडलेली आहे.या व्यक्तींच्या कथांमधून त्यांचे खडतर आयुष्य जगताना उपभोगलेल्या हाल अपेष्टा, सुखदुःखाच्या घटना,आर्त वेदना आणि संवेदना परखडपणे वास्तवपणे मांडलेल्या आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी तळागाळातील लोकांना...