सेवानिवृत्ती गौरव सोहळा
आज वयगाव,वाशिवली व मेणवली केंदसमुहाचे *केंद्रप्रमुख ,आमचे सन्माननीय बापूराव भगवान वैराट साहेब* हे नियतवयोमानाने २८ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत. *" आजची सकाळ एक बातमी घेऊन आली. जी ऐकूण क्षणभर शांतता पसरली सेवापुर्तीच्या वृत्ताने नयन भरुन आले अन् क्षणात आपले ज्ञानकार्य मनी दिसू लागले"* या चार ओळी लिहिणे जेवढे सोपे तेवढे प्रत्यक्षात आणणे महाकठीण…पण आपण मात्र या आज सत्य करवून दाखवल्या. *सर्वांशी मिळूनमिसळून,शिक्षकांचा कल पाहून काम कसं करावं अथवा करवून घ्यावं* हे जर कोणाकडून शिकायचे असेल तर आपल्याकडूनच. *कोणत्याही वयाच्या शिक्षक सहकार्यासोबतच काय तर विद्यार्थ्यांनसोबत ही आपण दुधात साखर विरघळावी तसे आपण विरघळलात.* म्हणूनच म्हणावेसे वाटते, * आठवणी आपल्या सोबतच्या पुन्हा पुन्हा आठवतात* *नयन सागरात दाटलेल्या अश्रूंना त्याच तर पाठवतात.* आपल्या सोबत घालवलेला प्रत्येकक्षण आम्हांस नक्कीच बरेच काही शिकवून गेला.या शिदोरीवर नक्कीच आम्ही आमच्या आयुष्यातील हा ज्ञानदानाचा प्रवास दैदिप्यमान करु.मात्र * वाटले नाही कधी आम्हाला तुमचा निरोप आपला घ्यावा लागेल* *सदा हास्यरूपी गालावर लप...