पुस्तक परिचय पाऊले चालती
पुस्तकांचे नाव . पाऊले चालती लेखक.... रवींद्रकुमार लटिंगे पुस्तक प्रकार.... प्रवास वर्णन प्रकाशक... ग्राम मित्र पब्लिकेशन किंमत .. एकशे पंचवीस रूपये पाने... एकशे बत्तीस वाचन साखळी समूहाच्या माध्यमातुन रवींद्र लटिंगे सरांचा परिचय झाला. प्रचंड वाचन असणारा हा माणूस. त्यांनी केलेली अनेक पुस्तक परिक्षण वाचून हा व्यक्ती केवळ वाचतच नाही तर त्या वाचनावर त्यांचे सखोल चिंतन आणि मनन पाहायला मिळत होते. त्यांनी केलेलं एखाद्या पुस्तकाचं परीक्षण म्हणजे लेखकाच्या कलाकृतीला मिळालेला बूस्टर डोस असे समजायला काहीच हरकत नाही. पेशाने शिक्षक असणारा माणूस म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. शिकवण हा तर प्रत्येक शिक्षकाचा स्थायीभाव आहे. या शिकवण्याबरोबर भ्रमंती, सूत्रसंचालन , वाचन ,लेखन, काव्यरचना अश्या अनेक क्षेत्रात ते कार्यरत आहेत. त्यांचं पाऊले चालती हे पुस्तकं हातात घेतलं. पुस्तकाचं मुखपृष्ठ आपल्याला आकर्षित करते. यात एकूण तीस छोटी मोठी प्रवास वर्णन या पुस्तकात आहेत. माणसाने ज्ञान आणि निसर्ग अनुभवण्यासाठी फिरल पाहिजे. भ्रमंती केल्यामुळे माणूस अगदी डोळसपणे पाहायला शिकतो. आपल्या आजूबाजूला निसर...