पुस्तक परिचय क्रमांक:१३९ स्वप्नांचे शिलेदार

वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१३९ पुस्तकाचे नांव- स्वप्नांचे शिलेदार लेखकाचे नांव- रेणू गावस्कर प्रकाशक-सकाळ प्रकाशन,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती- एप्रिल २०१९ पहिली पृष्ठे संख्या–१४३ वाड़्मय प्रकार-कथासंग्रह किंमत /स्वागत मूल्य--१८०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १३९||पुस्तक परिचय स्वप्नांचे शिलेदार लेखक: रेणू गावस्कर ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾 भोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेत, शिक्षणातून उजळलेली आयुष्याची वाटचाल अधोरेखित करणारा हा कथासंग्रह…. "अभावाच्या जगातील मुलांचे प्रतिकूल परिस्थितीच्या विरुध्द संघर्ष करीत जगणाऱ्या आणि होरपळणाऱ्या बाल्यांच्या या उत्तरांवर सोडाच;पण त्यांचे प्रश्नसुध्दा आपल्यापर्यंत नीटपणे पोहोचले नाहीत. सामाजिक लेखिका रेणू गावस्कर यांच्या 'स्वप्नांचे शिलेदार'या पुस्तकाने हे अभावाचे जग, अस्वस्थ करणारे जग आपल्या संकुचित झालेल्या अवक...