धन्यवाद दैनिक सकाळ:पाटीपूजन लेख

दैनिक सकाळ वृत्तसेवा सातारा आवृत्तीत साप्ताहिक शब्दांकुर पुरवणीत प्रसिद्ध झालेला लेख. आदरणीय अप्पा आपले आणि दैनिक सकाळ वृत्तसेवा तसेच शब्दांकुर साप्ताहिक पुरवणी संपादन समन्वयक प्रशांत घाडगे, आणि रचनाकार मदन इंदलकर आपणास कृतज्ञतापूर्वक धन्यवाद🌹🤝🙏🏻 🍁आदरणीय अप्पा आपले आणि दैनिक सकाळ वृत्तसेवा समूहाचे हार्दिक आभार.लिहित्या हातांचा गौरव करणारं आपलं कार्य.आपण जनमानसात लोकप्रिय असलेल्या दैनिक सकाळ वर्तमानपत्रात माझ्या लेखास प्रसिध्दी दिल्याबद्दल धन्यवाद!🌹🙏🏻 'पाटी पूजन' उन्हाळ्याचं आवातनं द्यायला वसंत ऋतूचे आगमन झालेलं असतं.वृक्षांची पानगळ होऊन नवीन पालवी फुटलेली असते.नव्या टवटवीत फर्णसंभारात कडुलिंबाची झाडे मनोवेधक दिसतात. तर देवचाफा नखशिखांत बहरलेला असतो.तर बहाव्याला पिवळीशार झुंबरं लगडायला सुरुवात झालेली असते.अन् काटेसावरीचा गुलाबी शेंदरी तांबडा अन् पिवळया रंगांचा फुलांचा बहार जाऊन हिरव्या केळीसारखी फळे लगडलेली असतात.मोगऱ्याच्या फुलांचा सुवास दरवळत असतो.चैत्र प्रतिपदेपासून शालिवाहन शके सुरू होते.समस्त हिन्दू बांधवांचे नववर्ष गुढीपाडवा या सणाने सुरू होते.नववर्षाचा शुभारंभ आणि...