पुस्तक परिचय क्रमांक:१३० पावसाआधीचा पाऊस






वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई

पुस्तक परिचय क्रमांक-१३०

पुस्तकाचे नांव-पावसाआधीचा पाऊस 

लेखिकेचे नांव-  शांता ज.शेळके

प्रकाशक- मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे 

प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण :ऑक्टोंबर २०१५ प्रथमावृत्ती

पृष्ठे संख्या–१४४

वाड़्मय प्रकार-कथासंग्रह

किंमत /स्वागत मूल्य--१४०₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१३०||पुस्तक परिचय

         पावसाआधीचा पाऊस 

लेखिका: शांता ज.शेळके

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

माणसाच्या मनाच्या गाभाऱ्याची खोली शब्दबध्द करणं सहज शक्य नसते.ते सर्जनशील विचारांचे सौंदर्य लाभलेल्या प्रतिभावान व्यक्तिमत्त्वेच सहजसुंदर सुंदर शब्दांत व्यक्तिचित्र रेखाटत असतात.मग ती साध्यासुध्या विषयावरील एखादी छोटीशी कथा असूद्या अथवा कादंबरी.वाचकाला आस्वाद घेताना कथेत गुंगून ठेवण्याचं कसब; शब्दसाजच करत असतात.त्या अक्षरधनाच्या सारथी आहेत. कविमनाच्या लेखिका बालसाहित्यिक शांता ज. शेळके.

शासकीय समितीवरील परीक्षण म्हणून केलेले कार्य महनीय आहे.आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

'पावसाआधीचा पाऊस'या शीर्षकावरून आपल्या समजून येते की निसर्ग आणि शांता शेळके यांचे ऋणानुबंध अतूट आहेत.ललित लेखनाच्या विषयातील वैविध्यता असते.त्या आवर्जून उल्लेख करतात की," आपल्या सभोवती डोळे उघडे ठेवून वावरणाऱ्याला विषयांचा तुटवडा भासणारच नाही.फिरताना दिसणारी माणसं हमखास घडणारे प्रसंग,एखादा अनामिक चेहरा पाहून लिहायला विषयांची रास दिसते.त्यातूनच वेधकपणे वेचून हृदयातल्या भावना कागदावर बरसतात अन् त्याचीच कथा निर्माण होते. "किती छान शब्दात मनोगत 'ओली झुळूक 'शीर्षकात व्यक्त झालेल्या भावना ऊनसावलीसारख्या कथासंग्रह वाचायला आतुरता दाटवतात.

या पुस्तकात एकूण २७ कथांचा समावेश लेखिका शांता शेळके यांनी केलेला आहे.या कथा म्हणजे माणसाच्या स्वभावाचे पैलू उलगडून दाखविणाऱ्या बीजकथाच आहेत.आनंदानुभवाने ओलंचिंब भिजवणाऱ्या या कथा आहेत.रांगेतला एक कुणी,मनातला किल्ला,ती,बाबेलचा मनोरा,पावसाआधीचा पाऊस,निसर्गाकडे परत, भूलभुलैया, शाळा सुटली पाटी फुटली,पेरणी,भेट,आला पाऊस आला. मरणाचे सुंदर मार्ग, शब्दांचे चेटूक आदी कथांचे रसग्रहण म्हणजे उत्कटतेचे सुंदर आविष्कार आहे.

भीतीने मनाचा थरकाप कसा उडतो,याची प्रचिती 'मनातला किल्ला ' ही कथा वाचताना लक्षात येते.बसस्टॉपवर बस येण्याची वाट पाहत रांगेत उभे असताना मनात चाललेले विचारांचे काहूर कसं माजत जातं याचा प्रत्यय 'ती', आणि 'रांगेतला एक कोणी'  या कथा वाचताना लक्षात येते.पाऊस येण्याची शक्यता कोणकोणती असते.त्या वातावरणाचे अतिशय समर्पक शब्दात वर्णन 'पावसा आधीचा पाऊस 'या कथेतून उलगडून दाखविले आहे.अनाहुतपणे एखाद्या घटनाप्रसंगाने आपल्याला अतिशय आनंद होतो.समाधानी व शांत चित्त होते.तो क्षण म्हणजे सहावे सुख असे लेखिका शांता शेळके आपल्या 'सहावे सुख'या कथेतून गुंफतात. आपल्या जवळच हे लपून बसलेले हे सुख आहे.ते अधूनमधून शोधणं गरजेचे आहे. जगाने वेड्यात काढलेली पण अंतर्यामी सुखाने तुडूंब भरलेली माणसेच वेगळी असतात.अशा माणसांच्या अंतरंगात डोकावून पाहिले तर ती त्यांच्या कार्यात सामाजिक बांधिलकी म्हणून कार्यरत असतात.छोट्याशा घटनेतील आनंदाचीही लयलूट ते करत असतात.

"आभाळात इंद्रधनू प्रगटल्यावर जसा आनंद होतो.तसेच चैतन्यात न्हाऊन जातो.आपल्या श्रमाचे,कष्टाचे, प्रतिभेचे, प्रयत्नांचे उभ्या वाटचालीचे सार्थक करणारा तो क्षण म्हणजेच "सहावे सुख"आहे".असं डॉक्टर यशवंत पाटणे यांचे 'सहावे सुख' हे पुस्तक वाचताना त्यातील उताऱ्याची 

आठवण आपणास करून देणारा हा लेख मनाला भावतो.  

मृगाच्या पावसाची आतुरता धुळवाफेवर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या मनात घोळत असते.कधी एकदा पावसाला सुरुवात होतेय अन् पिकांना ओलंचिंब करतोय. किंवा उन्हाच्या काहिलीत नेत्रसुखद गारवा निर्माण करायला पावसाचा वर्षाव कधी होतोय.त्या आतुरतेचे वर्णन अतिशय  सहजतेने 'आला,पाऊस आला 'या कथेत केले आहे.

बाळाला जोजवताना शब्दांची किमया बडबड गीतात कशी असते याची सुंदर कथा म्हणजे'शब्दांचे चेटूक'होय.शब्दांच्या नादाने वेडं होऊन अर्थांच्या महासागरात आपण कधी पोहोचलो.ते समजतच आपणाला शब्दांचे सामर्थ्य कळते.

     तैसे सद्भाव जीवगत

आतुल दिसती फाकत

स्फटिकगृहीचे डोलत

दीप जैसे….|

                  -संतशिरोमणी ज्ञानेश्वर

सज्जनांचे भाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून

बाहेर प्रगटतात.स्फटिकगृहाच्या पारदर्शक भिंतीतून डोलणाऱ्या दीपज्योतीचे चित्र मला दिसते.अनेक भाषेतील असंख्य शब्द भेटत गेले.त्या शब्दांनी मनावर संस्कार केले. रंगगंधरुपादी संवेदना जागविली. स्वत: लिहू लागल्यावरच सोप्या शब्दांचे स्फोटक सामर्थ्य दिसून आले. 

सुंदर उतारा 'शब्द सोडलेले धडे' या कथेतील आहे.जग काय किंवा आपण काय!सारे शब्द सोडलेले धडे आहोत.

मधल्या मधल्या जागा कोऱ्या.कोडे घालणाऱ्या.सदैव गूढात गुरफटलेल्या. पतीपत्नी सर्व नातेवाईकांशी आणि शेजाऱ्यांशी गोड,पण या दोघांचे कधीच एकमेकांशी पटलेलं नाही.सतत भांडण.या कोड्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा समजलं की त्या दोघांना भांडणं हाच त्यांच्या प्रेमाचा आविष्कार होता.हाच त्यांचा विरंगुळा होता. भांडल्यावर ते शिणून जात अन् मग एकमेकांचे कोडकौतुक व लाड करायला चढाओढ लागे.हे असे शब्द सोडलेले धडे असतात… 

सुंदर कथा संग्रह 'पावसाआधीचा पाऊस 'आहे.

आस्वादक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई



 




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड