पुस्तक परिचय क्रमांक:१२१वाचनमहत्ता
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚
१२१||पुस्तक परिचय
वाचनमहत्ता
लेखक व संपादक:प्रा.श्रीकांत नाईक
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾🎋🌾🍃
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१२१
पुस्तकाचे नांव--वाचनमहत्ता
लेखक व संपादकाचे नांव-प्रा.श्रीकांत नाईक
प्रकाशक- अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- प्रथमावृत्ती जानेवारी २०१८
पृष्ठे संख्या--२१२
वाड़्मय प्रकार-ललितलेख
किंमत /स्वागत मूल्य--३६०₹
"""""""""""""""""""""""""""""""
भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तक आणि ग्रंथालय प्रेमाचे वर्णन मलपृष्ठावर अप्रतिम शब्दात केले आहे.ग्रंथावर प्रेम करुन ग्रंथसंग्रह करणाऱ्या सर्वांना…! हे पुस्तक अर्पण केले आहे.
वाचनाचे महत्व अधोरेखित करणारे अनेक मान्यवरांचे लेख वाचताना अनेक नवनवीन विचार समजतात.किताब सफदर हाश्मी यांच्या'किताब'या कवितेचा भावानुवाद कवी दासू वैद्य यांच्या पुस्तके सांगतात गोष्ट….ही कविता रसग्रहण करताना पुस्तकातील नवलाईची गोष्ट मनात घर करते.
का वाचावीत पुस्तके?या सदरात अनेक मान्यवरांचे अभिप्राय विचारमौक्तिके पुस्तकाची महत्ता समजावून देतात.
"माझे ग्रंथालय म्हणजे माझा प्राण. पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्यासारखा दुसरा आनंद नाही.पुस्तके मला नवी वाट दाखवतात. ती मला खूप आनंद देतात."
--भारतरत्न डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर
"खरी वाचनाची परीक्षा म्हणजे कुठली पुस्तकं वाचली यापेक्षा कशी पुस्तके वाचली याला जास्त महत्त्व आहे.त्यामुळेच चिंतनाची चांगली सवय निपजते."
--यशवंतराव चव्हाण
" 'ग्रंथामुळे'बुध्दी पल्लवीत होते,मन प्रभावित होते आणि जीवन संस्कारीत होते. ग्रंथसंपत्तीवरुन त्या समाजसंस्कृतीचे निदान होते."--बाळासाहेब भारदे
"माझ्यावर एकाच एक अशा कुठल्याही पुस्तकाचा प्रभाव पडला नाही. एकच पुस्तक आयुष्यभर मेंदूशी धरून ठेवावे असं कधी झालं नाही आणि तसं वाटलंही नाही. वाचनामुळेंच आलेली अक्कल अशी की , आपण हे पुस्तक वाचत असलेलं पुस्तक अंतिम नाही त्यात सांगितलेलं ज्ञान सुद्धा अंतिम नाही."
--राजन खान
होईल जीवनाची उन्नती|ज्ञानविज्ञानाची प्रगती |ऐसीच हवी ग्रंथसंपत्ती| गावोगावी ||
---राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
कवी इंद्रजित भालेराव यांचे 'ग्रंथ माझे गुरू'ही कविता तर वाचनमहिमा अगाध करते.
अनेक सुप्रसिद्ध गाजलेल्या नामांकित कलाकार,साहित्यिक, गायक,थोर पुरुष, समाजसुधारक आदींचे ग्रंथवाचन निस्पृहता अधोरेखित केली आहे. त्यांच्या आवडीच्या व प्रभावित केलेल्या ग्रंथांची व पुस्तकांची जंत्री आणि वाचनीय विचारकौस्तुभ मनाला गारवा देतात.वाचनाला उद्युक्त करतात.थोर, नामांकित साहित्यिक आणि कलाकारांना बालपणापासून पुस्तकांनी कसे गारुड केले. आयुष्याची जडणघडण कशी होत गेली.याचे उत्तम उदाहरण म्हणजे विचारवैभवांचे पंचवीस लेख होत.ते लेखन म्हणजे उत्तम सादरीकरण असून सहज सुंदर प्रवाही शब्दात विवेचन केले आहे.
काळ अथवा शतक कोणतेही असो, संगणक -मोबाईल ते लॅपटॉपच काय सुधारित वैज्ञानिक साधने कितीही येवोत,पण पुस्तक-ग्रंथ वाचनाला अन्य प्रभावी सार्वत्रिक साधन किंवा पर्याय असू शकत नाही.मला वाचनाने घडविले तसे कोणत्याही वाचकाला जाणकारीने केलेले वाचन घडवील यात शंका नाही.ग्रंथ म्हणजे ज्ञानसमृध्द करणारे भांडार. विचारांना दिशा आणि शिस्त लावण्याचे काम वाचन कळते. मनुष्यत्वाची ओळख करून देणारे हे वाचन संस्कारित करुन ज्ञानश्रीमंत करते.
"वाचन म्हणजे प्रवास सुंदर
वाचन संगीत असो निरंतर
वाचन असते मार्गदीपिका
वाचन लिहिते जीवनगाथा…"
बहुतेक लेखक आणि कवींचा वाचन छंद म्हणून असलेला व्यासंग होऊन जातो.
ग्रंथासारखा गुरु नाही रे जगतात
ग्रंथासारखा मित्र नाही भरत मनात…
ज्ञानियाचा डोळा,अक्षरे लाभला
प्रकाश दिसला अंधारात…..
आपण शिकावे,लोका शिकवावे
शहाणे करावे सारे लोक….
आयुष्याच्या जीवनप्रवासातील जडण घडण ग्रंथांमुळे कशी होत गेली.याचा दस्तावेज ठरेल असं हे पुस्तक वाचनीय आहे…
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment