जिव्हेश्वर जन्मोत्सव २०२२

भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव वाई येथे संपन्न समस्त साळी समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव विविध उपक्रमांनी स्वकुळ साळी समाज वाई येथील बांधवांनी साजरा केला.सुर्योदयापुर्वी ,पूजा, पाळणा,आरती आदी कार्यक्रम संपन्न झाले.दुसऱ्या सत्रात देशासाठी शहीद झालेल्या वीरांना व ज्ञात- अज्ञात कलाकार, समाजसेवक व समाज बांधवांना श्रध्दांजली अर्पूण गुणगौरव सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक श्री रवींद्र लटिंगे यांनी केले.प्रमुख अतिथी व महाप्रसादाचे मानकरी सौ.निलिमा व श्री. महेंद्र शंकरराव धेडे व श्री दत्तात्रेय मर्ढेकर यांचे स्वागत अध्यक्ष श्री भास्करराव कांबळे यांनी केले. तद्नंतर कलाविष्कार रेकॉर्ड डान्स दिशा कोदे, ज्ञानदा दाहोत्रे यांनी बहारदार सादर केला.श्रेया पोरे हिने उत्कृष्ट वक्तृत्वाची झलक सादर केली.तदनंतर स्पर्धापरिक्षेतून न्यायाधिश पदी निवड झालेल्या कु.मैथिली प्रकाश मर्ढेकर , ओझर्डे व बावधन येथील पोलीस पाटील पदी नियुक्त झालेल्या श्री.मयूर कोदे व सौ.अश्विनी संजय हावरे ,उत्कृष्ट एम.एस.सी.आय.टी. केंद्राच्या संचालिका सौ.वनिता अजित हावरे आणि जिल्हास्त...