पुस्तक परिचय क्रमांक-११० खंबाटकी ते खाकी

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚 ११०||पुस्तक परिचय खंबाटकी ते खाकी लेखिका: सौ.शुभांगी उध्दव पवार ############################ वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य परिचय कर्ता-श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे, वाई पुस्तक परिचय क्रमांक-११० पुस्तकाचे नांव--खंबाटकी ते खाकी लेखिकेचे नांव--सौ.शुभांगी उध्दव पवार प्रकाशक-चैत्र प्रकाशन, कोल्हापूर प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथमावृत्ती १जून २०२२ वाड़्मय प्रकार--आत्मचरित्र पृष्ठे संख्या-९६ मूल्य/किंमत--१५०₹ ______________________________________ आयुष्यात आलेल्या सुखदुःखाच्या घटनांची साठवण केवळ मनात न ठेवता, त्यांनी 'जसं आहे तसं'शब्दबध्द करण्याची किमया लेखिका व कवयित्री सौ.शुभांगी उध्दव पवार यांनी 'खंबाटकी ते खाकी'याआत्मकथेत साकारलेली आहे. सातारा जिल्हा पोलिस दलात महिला पोलीस हवालदार पदावर कार्यरत असणाऱ्या लेखिका सध्या 'भरोसा सेल'मध्ये सेवेत आहेत.विशेष म्हणजे या आत्मकथनपर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सौ.पवार व श्री.पवार यांच्या १ जून २०२२रोजी लग्नाच्या वर्धापनदिनादिवशीच हॉटेल लेक व्...