पुस्तक परिचय क्रमांक-१०८ गोंदण

वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य परिचय कर्ता-श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे, वाई पुस्तक परिचय क्रमांक-१०८ पुस्तकाचे नांव--गोंदण लेखिकेचे नांव--शांता ज.शेळके प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण:आॅगस्ट, २०२०चौथी आवृत्ती वाड़्मय प्रकार--कवितासंग्रह पृष्ठे संख्या-१०४ मूल्य/किंमत--१२०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚 १०८||पुस्तक परिचय गोंदण लेखिका: शान्ता ज.शेळके 💫🍁💫🍁💫🔆💫🍁💫💫🍁🔆 ''रेशमाच्या रेघांनी लाल काळया धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काढीला हात नका लावू माझ्या साडीला….'' या लावणीचे बोल ज्यांच्या लेखणीतून उमटले त्या ख्यातनाम गीतकार, लेखिका, कवयित्री आणि अनुवादक शांताबाई शेळके यांचा 'गोंदण'हा काव्यसंग्रह १९७५साली प्रसिद्ध झालेला आहे. *हे पुस्तक वाचन साखळी समूहाच्या पुस्तक परिचय या उपक्रमात उत्कृष्ट अभिप्रायाबद्दल बक्षिस मिळालेले आहे.त्याबद्दृल संयोजिका आदरणीय प्रतिभाताई लोखंडे आणि उपाध्यक्ष व प्रायोजक कवी मनोजभाई अग्रवाल यांचे मनस्वी आभार!! प्रतिभावान साहित्यिक शांताबाई शेळक...