पुस्तक परिचय क्रमांक:१३३ रफ स्केचेस

वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१३३ पुस्तकाचे नांव-रफ स्केचेस लेखकाचे नांव- सुभाष अवचट प्रकाशक-समकालीन प्रकाशन , पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती- डिसेंबर २०२२ पृष्ठे संख्या–२०० वाड़्मय प्रकार- कथाचित्र किंमत /स्वागत मूल्य--४००₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १३३||पुस्तक परिचय रफ स्केचेस लेखक: सुभाष अवचट ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾 अनेक लेखक-कवींच्या पुस्तकांचे कव्हर, जाहिराती आणि पोर्ट्रेट तयार करणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ चित्रकार सुभाष अवचट यांनी रेखाटलेली ही 'रफ स्केचेस' ही साहित्य कृति.आपल्याला त्यांच्या आजवरच्या जीवनप्रवास सोबत ब्रश,हात आणि मन यांच्या त्रिवेणी आविष्कारातून कागदावर चितारलेली चित्रे.या चित्रांचा अंतर्बाह्य प्रवास उलगडून दाखवितात. चित्रकलेची सेवा करणाऱ्या थोर जागतिक प्रसिद्ध पावलेल्या कलाकारांची ओळख अधोरेखित करतात.त्यांना आयुष्यात भेटलेली दिग्गज माणसं,त्यांच्याशी झोडलेल्या गप्पांच्या मैफली, त्यांचं वेग...