पुस्तक परिचय क्रमांक:१३२ धना
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१३२ पुस्तकाचे नांव-धना लेखकाचे नांव- पै.गणेश मानुगडे प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस , पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-जुलै २०१८,पुनर्मुद्रण: डिसेंबर २०१८ पृष्ठे संख्या–१३२ वाड़्मय प्रकार-कादंबरी किंमत /स्वागत मूल्य--१८०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १३२||पुस्तक परिचय धना लेखक: पै.गणेश मानुगडे ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾 देशभक्ती,कृस्ती आणि प्रेम यांच्या वलयात सापडलेल्या पहिलवान धनाच्या संघर्षाची उत्कंठावर्धक आणि रोमहर्षक कथा आहे. सोशल मीडियाच्या आभासी पटलावर पैलवान गणेश मानुगडे 'मल्लविद्या' नावाने फेसबुकवर लाल मातीतल्या अस्सल जिगरबाज मल्लविद्येतील अभुतपूर्व थरारक पर्वाची महती प्रकाशित करतात.त्यांचे जगभरातील वाचक फॉलोअर्स सत्तर लाखांपेक्षा जास्त आहेत. त्यांच्या या उपक्रमाला दाद ७०पेक्षा जास्त पुरस्कारांनी गौरविलेली आहे.सन्मानित केले आहे.मल्लविद्येवर त्यांनी विपुल लेखन केले आहे. अत्तर,मित्र, चरित्र आणि चित्र यां...