पुस्तक परिचय क्रमांक:११५ उजेड अंधाराचं आभाळ

वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-११५ पुस्तकाचे नांव-उजेड-अंधाराचं आभाळ (फिरस्ती) लेखकाचे नांव-उत्तम कांबळे प्रकाशक- सकाळ प्रकाशन प्रकाशन वर्ष व आवृत्ती-दुसरी आवृत्ती/ डिसेंबर २०१७ पृष्ठे संख्या--११२ वाड़्मय प्रकार-ललित किंमत /स्वागत मूल्य--१४०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 ११५||पुस्तक परिचय उजेड-अंधाराचं आभाळ लेखक:उत्तम कांबळे ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾 ''आभाळ अनेक आकारांचं असतं… मोकळं आभाळ,पावसाच्या ढगांनी भरलेलं आभाळ, वांझोटे ढग गोळा करणारं आभाळ, कोणत्याही क्षणी डोक्यावर कोसळणारं आभाळ वगैरे वगैरे.डोक्यावर सतत तोल सावरत राहिलेल्या आभाळाला किती किती नावं दिली आहेत…. फिरस्ती करताना मलाही वेगवेगळी आभाळं बघता आली व माणसांच्या जगातलं आभाळ.. ते कधी वेदनेने भरलेलं तर कधी मस्तीत आलेल्या मोराला नाचण्यासाठी जागा देणारं… ते कधी कोडानं भरलेलं तर कधी सौंदर्य स्पर्धेत जाऊन आल्यासारखं...कधी फक्त उजेडानं भरलेलं तर कधी आपल्या शरीरावर फक्त अंधार आणि अं...