पुस्तक परिचय क्रमांक:१३१ एक भाकर तीन चुली

वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१३१ पुस्तकाचे नांव-एक भाकर तीन चुली लेखक- देवा झिंजाड प्रकाशक- न्यू ईरा पब्लिकेशन,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-डिसेंबर २०२३ प्रथम आवृत्ती पृष्ठे संख्या–४२४ वाड़्मय प्रकार-कादंबरी किंमत /स्वागत मूल्य--४५०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १३१||पुस्तक परिचय एक भाकर तीन चुली लेखक: देवा झिंजाड ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾 गावखेड्यातील शेतकरी आणि शेतमजूर स्त्रियांच्या जीवन संघर्षाची अन् आलेल्या संकटांना हिम्मतीने सामोरं जात आपल्या कुटुंबाची जोपासना करणाऱ्या स्त्रीची कहाणी. या कादंबरीचे मुख्य बीज खेड्यातील स्त्रीने आपल्या आयुष्याची होरपळ परवड कुचंबणा होत असताना सुद्धा आपल्या मुलाला काबाडकष्ट करून शिकवलं.हे मुख्य कथाबीज आहे. बऱ्याच दिवसांनी एक अस्सल मराठमोळं साहित्य .मातृत्वाचे जीणं जगताना झालेली आयुष्याची होरपळ आणि परवड वास्तव शब्दात लेखक देवा झिंजाड यांनी व्यक्त केलीय वेदनादायी ...